स द गु रू सारखा असता पाठीराखा.

 

स द गु रू सारखा असता पाठीराखा.

 

 
एकदा आपण गुरु केला व त्यांनी आपल्याला गुरुदीक्षा दिली किंवा संयोगाने मिळाली तर त्यानंतरच्या काळात आपण सदैव गुरूचा विचार केला पाहिजे. त्यांनी दिलेली शिकवण ही तंतोतंत अमलात आणली पाहिजे.
 
आपण केलेला गुरु चांगला व दुसरे गुरु किती वाईट आहेत याचा भेदाभेद करू नये. आपल्याला मिळालेले गुरु हे आपल्या प्रारब्धामुळे आपल्याला प्राप्त झाले आहेत. आता तेच गुरू आपल्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ व आपले मार्गदर्शक असून त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्याचे कल्याण होणार आहे, ही भावना बाळगली पाहिजे.
 
आपल्या गुरूवरील विश्वास दृढ असला पाहिजे. त्यांनी आपल्याला ज्या गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत, केवळ आणि केवळ त्याच गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे. गुरु आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतात. शिवाय गुरूंच्या सान्निध्यात गेल्यावर गुरु आपल्यातील भाव ओळखून योग्य ती सेवा करण्यास सांगतात. गुरु हे अंतर्ज्ञानी असतात.
 
एकदा गुरु केला की आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे, त्यात चांगले-वाईट यांचा सुद्धा समावेश होतो, त्यावर काय उपाययोजना करावी हेही गुरूच ठरवीतात. म्हणून गुरु आपल्या आयुष्याचे रक्षक आहेत याची जाण ठेवावी. गुरु हे परमेश्वर व आपल्यामधील एक माध्यम आहेत, तेच आपले तारणहार आहेत ही भावना जोपासली पाहिजे
 
गुरुच्या ठिकाणी समर्पण भावना ठेवावी.आज जे काही आपल्या जवळ आहे किंवा आपल्याला मिळाले आहे ते त्यांच्याच कृपेमुळे मिळाले आहे. त्यामुळे जे काही आपले आहे तेच गुरुंचेच आहे ही समर्पण भावना ठेवून त्यांना सर्व अर्पण करावे.
 
गुरूंची खरी सेवा म्हणजे त्यांच्या आज्ञेचे पालन करणे होय. या आज्ञेचे पालन करून जो गुरुंच्या समीप जातो तो खरा साधक बनतो.

Post a Comment

Previous Post Next Post