आध्यात्मिक प्रगती साठी महत्त्वाचे आहे, आपल्यातील अहंकार, मी पणा, राग, मद-मत्सर या गोष्टी निघून जाणे. जेव्हा या गोष्टी आपल्या मध्ये नसतील तेव्हाच त्याला आध्यात्म समजू शकते व त्याची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. अंगी नसावा मोठेपणा मुंगी साखरेचा रवा. अंगी कोणाताही मोठेपणा न बाळगता लहान मुंगी सारखे राहून आपण आपले आध्यात्मिक कार्य करणे खुप महत्त्वाचे आहे.
Tags
अध्यात्म