मला
खूप गंमत वाटते की लोक मला प्रार्थना करतात की "गुरुदेव मला प्रपंचातून
मुक्त करा. मला ही मोहमाया नको." पण हे इतके सोपे नाही. मला प्रार्थना करून
तुम्ही परत मोहात अडकताच. त्यामुळे तुम्हाला त्याग करणे अवघड जाते.
आयुष्यभर बायकोला शिव्या देतात आणि ती गेल्यावर रडतात, असे अनेक पुरुष मी
पाहिले आहेत.
पैसे कमावताना सुद्धा आपण पुढच्या पिढीचा विचार करतो. आपल्याला पुरून आपल्या मुलाबाळांना पुरले पाहिजे नाही तर मुले म्हणतील बापाने आमच्यासाठी काही केले नाही म्हणून संचय करता. पण काही संतती अशी होते की बापाने कमविलेले ऐश्वर्य काही क्षणात फुंकून टाकते. संपत्ती कमविण्याचा मार्ग कसा आहे हे महत्त्वाचे. चांगल्या मार्गाने कमविलेल्या संपत्तीला संतती चांगल्या प्रकारे सांभाळते किंवा त्या संततीच्या ऐश्वर्यात वाढच होते. आपण कधी असाही विचार करतो की आम्ही इतके कमविले पाहिजे कि पुढच्या सात पिढयांना पुरेल. पण असा संचय चांगला नाही. पाणी हे प्रवाहात राहिले की स्वच्छ राहते. तसे संपत्ती सुध्दा प्रवाहित राहिली पाहिजे तरच तिचा उपयोग होतो.

तुम्ही
जे काही कमावता त्यावर तुमच्या एकट्याचाच हक्क नसतो. तुमच्यावर अवलंबून
असलेले, तुमच्या अवतीभोवती वावरणारे, तुमचे सहकारी, नातेवाईक यांना तुम्ही
अडीअडचणीत आर्थिक मदत केलीच पाहिजे. तुमच्या कुलदेवतेची सेवा केली पाहिजे.
धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक कार्याला आर्थिक मदत दिलीच पाहिजे. तुम्हाला
जेवढी शक्य असेल तेवढी मदत समर्पण भावनेने करा. याखेरीज जेथे चांगले काम
चालले आहे अशा समाज उपयोगी संस्थांनाही मदत करावी. त्यामुळे तुमची संपत्ती
प्रवाहित राहते. भरून ठेवलेल्या पाण्याला काही दिवसांनी डास उत्पन्न होतात
तसे ही संचयित संपत्ती गोठवून ठेवली तर घराण्यावर त्याचे दुष्परिणाम होतात.
गृहस्थी चालविताना अनेक अडचणी येतात. संततीचे प्रश्न निर्माण होतात.
शारिरीक व्याधी निर्माण होतात. काही त्रास असे असतात की त्यावर कोठेही उपाय
सापडत नाही. हा त्रास पुढच्या पिढीला सहन करावा लागतो. कारण बापाचा बाप
किंवा बापच मुलाच्या पोटी जन्म घेऊन आपल्या पूर्व कर्माची शिदोरी बरोबर
आणीत असतो.
खरेच तुम्हाला प्रपंचातून मुक्ती हवी असेल तर भगवंताची स्मरण भक्ती करा. चिंतन, नामस्मरण करून आत्मपरीक्षण करीत राहा. वयाच्या चाळिशीनंतर प्रपंचातून निवृत्त होण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ संन्यास धारण करा, अंगाला भस्म लावा असा होत नाही तर स्वभावाला मुरड घालायला शिका. हट्ट सोडा. आपले अवगुण कमी करत राहा. ते देवाला अर्पण करा. हे हळूहळू साचेल. एकदम साधणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानि वानप्रस्थाश्रमास सुरुवात होईल.
साभार: गुरुजी
Tags
सद्गुरू