देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे ?


 

देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे ?

१. पादत्राणे देवळाच्या बाहेर शक्यतो आपल्या डाव्या हाताला काढावीत.
२. पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुऊन अपवित्रः पवित्रो वा.असे म्हणत स्वत:वर तीन वेळा पाणी शिंपडावे.
३. देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा, तसेच देवळाकडे जातांनाही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.
४. देवळाच्या पायर्या चढता चढता उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्याला लावावा.
५. देवळात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराला नमस्कार करा
 
देवतेचे दर्शन कसे घ्यावे ?
 
१. देवळातील घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी.
२. देवतेच्या मूर्तीसमोर असलेल्या कासवाच्या (शिवाच्या देवळात नंदीच्या) कडेला उभे राहून हात जोडून दर्शन घ्यावे.
३. आधी देवतेच्या चरणांवर दृष्टी ठेवून लीन व्हावे, नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे आणि शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यांत साठवावे.
४. फुले देवतेच्या अंगावर न फेकता तिच्याचरणांवर वाहावीत. मूर्ती दूर असल्यास सर्व वस्तू समोरील ताटात ठेवाव्यात.


Post a Comment

Previous Post Next Post