आपले दुष्कर्म हे आपल्याला भोगावेच लागते..

आपले दुष्कर्म हे आपल्याला भोगावेच लागते..

कर्मचक्र फेरा हे वारंवार ऐकले, बोलले अथवा वाचले जाते, पण ते म्हणजे नेमके काय हे पाहू.
 
जगातील सर्व योनीत देह धारण करणारा प्रत्येक जीव हा या कर्मचक्रानुसार जन्म घेतो त्यानुसार जीवन व्यतीत करुन त्यानुसारच जीवन संपवतो. यातून कोणाचीही सुटका नाही. मागील संचित व कर्मानुसार झालेला जन्म या जन्मातील कर्मानुसार जीवन संपवतो व पुढील जन्म प्राप्त त्यास मिळतो.जे योग्य अध्यात्मिक मार्गात राहून जीवन घालवतात ते या किंवा पुढील कोणत्यातरी जन्मात जीवनमुक्त होतात व या चक्रातून सुटतात.
 
पितामह भीष्म शरपंजरी पडले होते त्यांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती केली व कृष्ण हे भगवंत आहेत हे देखील जाणले होते पण असे मरण येत आहे याचे शल्य त्यांना सलत होते शेवटी भगवंताची शरपंजरी अवस्थेत त्यांची भेट झाली असता त्यांनी विचारले हे देवकीनंदन मला असे मरण का येत आहे हे मला समजत नाही.माझ्या भक्तीच्या आधारे मी मागील तीन जन्म जाणू शकतो त्यातही काही पाप घडलेले नाही मग असे का व्हावे.भगवंताने त्यांच्या भृमध्यावर बोट ठेवून डोळे मिटण्यास सांगितले असता त्यांना मागील एकेक जन्म दिसू लागला ९९ जन्मापर्यंत कोणतेही पाप घडले नव्हते १०० वर्मा जन्मात ते एक राजा होते त्यांना दरबारात सेवकाने येवून सांगितले महाराज नगरात राजरस्त्यावर एक मोठा अजस्त्र सर्प पसरलेला असून नागरिकांना तेथून जा ये करता येत नाही त्यावर त्या राजाने तो सर्प तेथून हलवून जंगलात सोडून द्या अशी आज्ञा दिली सेवकांनी तसे केले परंतु तसे करताना तो सर्प एका काटेरी झुडपात पडून त्याच्या सर्वांगात काटे शिरुन असह्य वेदनेने तडफडून काही दिवसांत मरण पावला.
 
हे पाहिल्यावर भीष्मांनी विचारले देवा हे मी केले नाही व तसे करण्यात माझा काही स्वार्थ नव्हता व ते लोकांच्या भल्यासाठीच केले होते भगवंत म्हणाले पितामह ते तुमच्या आज्ञेने झाले म्हणजे कारणीभूत तुम्हीच ठरलात तुमचा उद्देश चांगला असो वा नसो पण एका जीवास मरणप्राय वेदना होवून त्याला मरण आले.
 
मी जेंव्हा कोणालाही मुक्ती देतो तेंव्हा त्याच्या मागील सर्व कर्मांचे भोग भोगायला लावूनच पूर्ण शुद्ध व पवित्र करुनच माझ्यात सामावून घेतो. हे आहे कर्मचक्र साधक भक्त यांना जो जास्त त्रास होतो त्याचे‌ कारण हेच आहे मागील सर्व पापांची कर्मांचीभोगाद्वारे निवृत्ती करुन घेतली जाते आणि भोग भोगल्याखेरीज अद्वैत प्राप्ती होत नाही.
 
भोग भोगीताची आटला भेद (श्री संत तुकाराम महाराज)
तरी हे माझ्याच बाबतीत का घडते हा विकल्प कधीच मनात  आणू नका भगवंतास जाणणा-या भीष्मांना देखील १०० व्या जन्मात कर्मचक्राचा भोग भोगायला लावून नंतरच मुक्त केले आपल्याला तर मागचा जन्मही आठवत नाही. 
 
सद्गुरु उपासना व सतत नामस्मरण यामुळे आपण मुक्त होवू शकतो कारण अंतकाळी ते शिष्याजवळ उपस्थित असतात व यमदूता पासून वाचवतात पण तेवढा दृढ विश्वास व पराकोटीचा भाव असला तरच

Post a Comment

Previous Post Next Post